Halloween party ideas 2015

अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर येथील बहुचर्चित वेस (दगडी दरवाजा) चे भूमिपूजन सोहळा २४ तारखेला सकाळी १० वाजता आमदार अनिल पाटील,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या शुभहस्ते व अमळनेर च्या लोकनियुक नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

*दगडी दरवाजाचा आजपर्यंतचा खडतर प्रवास*

अमळनेर वेस(दगडी दरवाजा) संरक्षित स्मारक राज्य संरक्षित स्मारकाच्या शासन निर्णय १५ जानेवारी १९७० अन्वये राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले होते.
कृषिभूषण साहेबराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी वेस (दगडी दरवाज्याच्या) स्मारक दुरुस्तीबाबत पाठपुरावा सुरू केला होता,त्यावेळी सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांनी दखल घेत २९ मे २००९ रोजी देखभाल व दुरुस्तीबाबत काही अटींवर परवानगी देण्यात आली होती.
दगडी दरवाजाचा पूर्वेकडील बुरुज २४ जुलै २०१९ रोजी पावसामुळे क्षतिग्रस्त झाला होता,त्यामुळे तात्पुरती गोण्यांची व्यवस्था करण्यात आली,परंतु भविष्यात हा क्षतीग्रस्त भाग पुन्हा कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने,खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक इतर रस्त्यावरून वळवण्यात आली होती.
या सर्व गोष्टींचा विचार करता अमळनेर वेस(दगडी दरवाजा) या संरक्षित स्मारकाचे जतन दुरुस्ती कामाऐवजी स्मारकाचे महत्व जतन करून अमळनेर शहरातील वाहतुकीची कायम कोंडी सोडवण्यासाठी, शहराची विकास यंत्रणा असलेल्या नगरपरिषद विकास योजनेनुसार(DP व TP) सदरची वेस देखरेख व दुरुस्ती कामाकरिता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार,अमळनेर नगरपरिषदेने ७ जानेवारी २०२० रोजी विशेष सभा क्रमांक ३२ ठराव क्रमांक ६९२ करून तसा प्रस्ताव नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनाला पाठपुरावा केलेला होता.
त्यानुसार वेस(दगडी दरवाजा) संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात यावे ही लोकप्रतिनिधींची मागणी मान्य करून सदर स्मारक नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्याचे १९ मार्च २०२० च्या पत्रात प्रस्तावित केले, तथापि कोरोनाच्या प्रभावामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांसमोर स्मारकाचे सादरीकरण करण्यास अडचणी येत होत्या,म्हणून स्मारकाच्या हस्तांतरणाची अधिसूचना रद्द करून,२६ जून २०२० च्या शासन निर्णय अन्वये संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई यांना महाराष्ट्र वैभव,राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेअंतर्गत अमळनेर नगरपरिषद यांना संगोपणार्थ १० वर्षासाठी अमळनेर वेस (दगडी दरवाजा) शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे.
त्याप्रमाणे अमळनेर नगरपरिषद यांनी शासन निर्णय २६ जून २०२० च्या अन्वये २२ ऑक्टोबर २०२० रोजी अमळनेर शहर हद्दीतील वेस(दगडी दरवाजा) साठीचे दुरुस्ती व संवर्धनाच्या कामाचे आदेश ठेकेदार अमन कन्स्ट्रक्शन यांना रक्कम १ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपये याप्रमाणे ठेका देण्यात आला.
सदर कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष बिजू लांबोळे, नगरसेवक मनोज दाजीबा पाटील,नरेंद्र संदनशिव,संजय पाटील,निशांत अग्रवाल,विवेक पाटील,रवि पाटील,बाबू साळुंखे,यनेश्वर पाटील,दीपक पाटील,साखरलाल महाजन,बबली पाठक,प्रताप शिंपी व नगरपरिषदेचे इतर नगरसेवक तसेच योगेश मुंदडे,विनोद भय्या,विक्रांत पाटील,हरी भिका वाणी,रणजित शिंदे,संदीप घोरपडे,सुभाष चौधरी,संतोष लोहेरे,पिंगळे डॉक्टर,भागवत गुरुजी,कमल दलाल,शेखा हाजी,फय्याज पठाण,सत्तार तेली,सुरेश पाटील,एल.टी.पाटील,
ठेकेदार चेतन शहा,चेतन सोनार,मुख्याधिकारी विद्या गायकवाड व नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी अमळनेर नागरी हित समितीतर्फे अशोक पवार तसेच राजे संभाजी मित्र मंडळाचे पंकज चौधरी यांनी कृषिभूषण साहेबराव पाटील व पुष्पलता पाटील यांचा सत्कार केला.
सदर दगडी दरवाजा नगरपरिषदेला देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्याकामी आमदार अनिल भाईदास पाटील,तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,प्रांत सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

*नगरपालिकेच्या तिजोरीवर भार पडणार*
सदर कामासाठी १ कोटी १२ लाख, ९९ हजार २७३ रुपये प्रस्तावित आहेत.नगरपालिकेच्या तिजोरीवर जरी भार पडणार असला तरी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी याकामासाठी ५० लाखापेखा जास्तीचा निधी शासनाकडून आणण्याचे या प्रसंगी मान्य केले आहे,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील हा एक प्रकल्प आहे.खऱ्या अर्थाने स्मारक नव्याने उभं राहिल्यानंतर त्यांची ती स्वप्नपूर्ती ठरेल.






WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.