**सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गटई कामगारांना गटई स्टॉलचे वाटप*-
जळगांव प्रतिनिधी
दि-२३/१०/२०२० रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव व संत रोहिदास चर्मकार महामंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय अमळनेर येथे सहाय्यक आयुक्त श्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने गटई कामगारांना गटई स्टॉल व रोख ५०० रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले, स्टॉल वाटपाप्रसंगी तालुका समन्वयक चेतन चौधरी, संत रोहिदास चर्मकार महामंडळाचे प्रतिनिधी विलास भावसार शासकीय वसतिगृहाचे श्रीमती मंगला पाटील,पप्पु करोसिया,ज्ञानेश्वर धोबी,अशपाक शेख,विशाल बिरारी आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले.