*कोविड- 19 ब तपासणी संपन्न*
अमळनेर येथील श्री एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल शाळेत मुंदडा फाउंडेशन व महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ अमळनेर संचलित श्री एन. टी . मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल, श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, स्व. श्री एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालय, श्री एन. टी. मुंदडा विद्या मंदिर ,माळीवाडा अमळनेर आणि स्व. पं. श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर ,अमळनेर अशा सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड -19 ची तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांच्या आदेशानुसार आज रोजी करण्यात आली.
सदर प्रसंगी संस्थाध्यक्ष प्रकाशभाऊ मुंदडा यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व उपस्थितांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह यावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. त्यानुसार अमळनेर नगरपरिषद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. गिरीष गोसावी, डॉ. राजेंद्र शेलकर, लॅब टेक्निशियन राहुल महाजन, जीएनएम प्रसाद क्षीरसागर, न. पा. कर्मचारी सहकारी मनोज निकुंभ, प्रशांत वाणी, मनोज सोनार, संजय माळी यांच्या नेतृत्वाखाली 167 कर्मचारी वर्गाचे 25 - 25 च्या गटानुसार स्वब घेण्यात आले . आणि काही मिनिटांत रिपोर्ट घोषित करण्यात आले. त्यानुसार *सर्व 167 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत.*
सर प्रसंगी प्राचार्य लक्ष्मण सर, विद्या मॅडम, नरेंद्र पाटील, मुख्याध्यापक संदीप पवार, किशोर पाटील, अविनाश पाटील, पी. एस. विंचूरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शर्मा सर, जोशी सर, योजना ठक्कर मॅडम, डी. ए .सोनवणे आदींनी सहकार्य केले. तद्नंतर सर्व उपस्थितांना चहापान करण्यात आला.