Halloween party ideas 2015

*गट प्रवर्तक व आशा वर्कर यांचा लासुर येथे कोरोना योद्ध्या म्हणून सन्मान*

लासूर प्रतिनिधी :- सध्याची कोविड 19 परिस्थिती पाहता सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन लासुर ता.चोपडा येथील गट प्रवर्तक व आशा वर्कर यांनी कोरोना १९ च्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता "संबंध गाव हेची माझे घर"ही भावना लक्षात घेऊन गावातील सर्वसामान्य जनतेची बाधित क्षेत्रात जाऊन तपासणी केली व योग्य ते उपचार संदर्भात संवाद व मार्गदर्शन केले. त्यांच्या या निस्वार्थ कार्याची दखल घेत श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने खऱ्या अर्थाने समाजाची बांधिलकी जोपासणाऱ्या या कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री संत सावता माळी युवक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री जितेंद्र महाजन यांनी युवक संघाच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली तसेच सध्याच्या कोविड 19 च्या प्रादुर्भावात सुद्धा युवक संघ कशा पद्धतीने तत्परतेने कार्य करत आहे हीदेखील माहिती त्यांनी यावेळी दिली तर अध्यक्षीय मनोगतात अजय पालिवाल यांनी युवक संघाचे कार्य हे समाजामध्ये निस्वार्थ सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तसेच आरोग्य शिबीर, आदिवासी कुटुंबाना दिवाळी निमित्त फराळ वाटप असे अनेक समाजपयोगी उपक्रम युवक संघ राबवित असतात त्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे यावेळी बोलून दाखविले तसेच युवक संघ हे कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून सामाजिक बांधिलकी जोपासत नियमित समाजसेवा च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाला लासूर किसान विद्या प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष अजय पालिवाल हे अध्यक्ष म्हणून तर अतिथी म्हणून लासूर नगरीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती जनाताई सुखदेव माळी,तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष ए के गंभीर सर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिनेश निळे, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक महाजन,रामचंद्र बारेला,वासुदेव महाजन, सुरेश महाजन, हिम्मत माळी सर, सामाजिक कार्यकर्ते किशोर माळी सर, श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र माळी, डॉ.अमित देसले, आरोग्य सेवक नितीन चव्हाण, एस.टी.पाटील, टेक्निशियन मनोज महाजन
यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात गट प्रवर्तक सरला माळी, शैला राजपूत तसेच आशा वर्कर अंजना महाजन, विजया महाजन,वैशाली कोळी, प्रतिभा माळी,जयश्री पाटील, नगुबाई चांभार, सुनंदा पाटील, वनिता मोरे,फुलाबाई भिल,भारती माळी यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका उपाध्यक्ष जितेंद्र मच्छिंद्र महाजन, सह सोशल मीडिया विशाल माळी सदस्य दिनेश माळी, आकाश माळी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जितेंद्र महाजन यांनी केले.






WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.