प्रताप महाविद्यालय प्राचार्या यांना भाजप युवा मोर्चा तर्फे निवेदन...
ऑटोनॉमस कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत...
अमळनेर प्रतिनिधी
सन 2019-20 च्या शैक्षणिक वर्षात ऑटोनॉमस कॉलेजच्या विध्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मागितले होते.त्या वेळी आम्ही आपणास निवेदन दिले की,शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ओला दुष्काळाने खालवलेली आहे.तरी परीक्षाशुल्क घेण्यात येवू नये .जास्त करून ग्रामीण भागातील विध्यार्थी आपल्या कॉलेजला आहेत.तरी देखील परीक्षा शुल्क घेण्यात आलेली आहे.परंतु मार्च 2020 ला कोवीड -19 मुळेसर्वच परीक्षा शासन मार्फत रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्या ऑटोनॉमस कॉलेज ची देखील परीक्षा रद्द झाल्या आहेत.म्हणून आपण परीक्षासाठी घेतलेले परीक्षा शुल्क सर्व विद्यार्थ्यांना परत करावे.जेणे करून पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी आर्थिक मदत होईल.कारण कोविड -19 मुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.म्हणून आपण ऑटोनॉमस कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे असे निवदनाद्वारे
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, अमळनेर
शिवाजी राजपूत तालुकाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पंकज भोई,योगीराज चव्हाण,राहुल चौधरी,कल्पेश पाटील,अभिषेक पाटील,गौरव महाजन,शोएब शेख...यांनी मागणी केली आहे.
फोटो