Halloween party ideas 2015

शिक्षकांनी तंत्रस्नेही बनणे काळाची गरज
केंद्रप्रमुख-अरूण मोरे
गडखांब केंद्राची आँनलाईन शिक्षण परिषद, उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सध्या आपल्या देशात कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद व शिक्षण प्रक्रिया सुरू असल्याने काळानुसार शिक्षक बांधवांनी स्वतः बदलून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आँनलाईन शिक्षण प्रक्रीयेचा वापर सुरू आहे . पालकांना विश्वासात घेऊन आँनलाईन शिक्षण पद्धतीचे महत्त्व समजून दयावे. शिक्षकांनी तंत्रस्नेही बनणे काळाची गरज आहे असे गडखांब केंद्राची गुगल मिटद्वारे शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख अरुण मोरे बोलत होते.
गडखांब केंद्राची आँनलाईन शिक्षण परिषद दि.27/8/2020 गुरुवार रोजी स.11.00 ते दु.1.00 या वेळेत घेण्यात आली.शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी जैतपीर/गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अरुण मोरे होते. निवेदक म्हणून तंत्रस्नेही शिक्षक खेमचंद्र पाटील सर व सहाय्यक म्हणून विठ्ठल पाटील सर यांनी विषय हाताळले. परिषदेतून खालील प्रमुख विषयावर शाळानिहाय चर्चा करण्यात आली.
1) कोविड 19 च्या काळातील शाळेतील विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन कामी राबवलेली आँनलाईन व आँफलाईन शिक्षण प्रक्रिया
2)कोविड काळातील आँनलाईन व आँफलाईन शिक्षणाचा राबवलेला सर्वोत्तम उपक्रम :- यांवर चर्चा व संकलन
3)लाँकडाऊन काळातील- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एप्रिल 2020 पासून ची शासन परिपत्रके यांवर संक्षिप्त चर्चा व मार्गदर्शन
4)तंत्रस्नेही शिक्षणाची गरज
यांसारख्या महत्वपुर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. शाळानिहाय मी राबवलेला सर्वोत्तम उपक्रम याअंतर्गत शिक्षकांनी अनुभवलेले चांगले अनुभव ऐकवयास मिळाले,त्याचा केंद्रातील शिक्षकांना निश्चित फायदा होईल.यांत विशेष करुन रमेश पाटील देवगाव,विठ्ठल पाटील नगांव खुर्द,मणिलाल पाटील नगांव खुर्द, मंगलाताई पाटील ग्रे.मुख्या.गडखांब, कैलास माळी पातोंडा कन्या,कमलेश मोरे,सुनील सोनवणे दापोरी बु. पातोंडा बाँईज, ए.एम्.महाजन सर यांनी उदाहरण देवून सकारात्मक विचार मांडले. शिक्षण परिषदेस प्राथमिक व माध्यमिक शाळेचे एकूण 35 शिक्षक/मुख्या.उपस्थित होते. चर्चा विषयांत केंद्रातील देवगाव-देवळी माध्यमिक शाळेतील शिक्षक व पत्रकार ईश्वर महाजन हे सहभागी होऊन कोविड 19च्या राबवलेली आँनलाईन व आँफलाईन प्रक्रियाच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण यांवर चर्चा व मार्गदर्शन केले. ग्रुपमध्ये असल्याने केंद्रातून दिली जाणारी माहिती,केंद्रातून राबवत असलेले उपक्रम,व त्यांची पुर्तता होण्यासाठी करत असलेला पाठपुरावा करण्याच्या पद्धतीचे त्यांनी कौतूक केले. परिषदेत खेमराज बोरसे,प्रतिभा पाटील, प्रतिभा बोरसे, शितल भामरे,सुनील सोनवणे, यासह सर्व शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला. कोविड काळातील एप्रिल 2020पासूनची शासन परिपत्रके यांवर वेळेअभावी संक्षिप्त माहिती सांगीतली.
केंद्रप्रमुख मोरे पुढे म्हणाले की
आजच्या स्पर्धेच्या युगात सर्व शिक्षकांनी मला तंत्रज्ञानाचे येत नाही,मला यांतल समजतच नाही,जमत नाही असे म्हणून आपले अज्ञानपण दाखवण्यापेक्षा ते अवगत करण्यासाठी तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे.ज्यांना तंत्रज्ञान अवगत नसेल त्यांनी तंत्रज्ञान शिकून घेण्याबाबत आवाहन केले. येणेप्रमाणे गडखांब केंद्राची आँनलाईन शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. आँनलाईन परिषदेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.
फोटो






WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.