अमळनेर प्रतिनिधी
राज्यातील प्रवासी व माल वाहातूक वाहानांचा एप्रील ते सप्टेंबर २०२० या ६ महिन्यांचा कालावधीतील लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर रोड टँक्स माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसार माद्यमांना दिली सुमारे ११ लाख ४० हजार वाहान मालकांना याचा लाभ होणार आहे तर ७०० कोटी रूपयांचा महसूलाचे यामूळे राज्य शासनाचे नूकसान होणार आहे शासनाच्या या निर्णयामूळे खान्देशातील सूमारे ६०० लक्झरी मालक व हजारो मालवाहातूक दारांना याचा लाभ होणार आहे मात्र या निर्णयाने आम्हाला लाभच होत नसून हे म्हणजे प्रेताचे शरीरावर फूले फेकण्याचा प्रकार असल्याची तिखट प्रतिक्रिया सर्वात जूने अजय ट्रँव्हल्सचे मालक अजय केले यांनी बोलतांना दिली आहे
--------------चौकट----'--------------
कही खूशी कही गम
दरम्यान मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वाहानांची चाके थांबल्या नंतर जळगांव जिल्ह्यातील सूमारे ४०० लक्झरी चालकांपैकी ७० टक्के वाहन मालकांनी आपल्या गाड्या नॉन यूज केल्याने त्यांना रोड टँक्स भरण्याची गरजच नसल्याने त्याचा खऱ्या अर्थाने २५ ते ३० टक्केच वाहान मालकांना लाभ होणार आहे तर मालवाहातूक दारांना बऱ्या पैकी लाभ होईल त्यामूळे कही खूशी कही गम अशी अवस्था आहे गेल्या
----------''----------------------------------
६ महिन्यात झालेल्या नूकसानीला वाहान मालकांना आर्थीक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला असला तरी आम्ही व्यवसाय करून जर टँक्स माफ झाला असता तर आम्हाला लाभ मिळाल्याचा पूर्ण आनंद झाला असता असे लक्झरी मालकांचे म्हणणे आहे याबाबत सर्वच लक्झरी मालक व त्यांच्या संघटनेच्या वतिने सांगण्यात आले कि खरं तर टॅक्स माफी मिळाली म्हणजे आम्हाला खूप काही मिळाले असे नाही आणि आम्ही जिंकलो वगैरे नाही या फक्त भावनिक गोष्टी आहेत, एप्रिल ते सप्टेंबर हा ६ महिण्यांचा टॅक्स माफ झाला/केला याला काहीच अर्थ नाही, असाही आम्ही भरणारच नव्हतो, कारण मोठ्या प्रमाणात बस मालकांनी मार्च महिण्यातच नॉन युज अर्ज केला आहे,
असो झालाच माफ तर आनंदच आहे,परंतु काही बस मालकांनी आपली वाहने Non-use केल्या नाहीत त्यांना याचा फायदा होणार का याचाही विचार करावा लागेल
पण खरी लढाई तर आत्ता सुरु झाली आहे बँक, फायनान्सर आता बोकांडी बसणार आहेत, पैसे भरा किंवा बस जमा करा अशा भूमिकेत असणार आहेत,
पार्किंगचे मालक पैसे दिल्या शिवाय बस पार्किंगच्या बाहेर येऊ देणार नाही,
पुढील टॅक्स भरल्याशिवाय RTO बस चालू देणार नाही,
किरकोळ मेंटनंस जसे कि बॅटरी, टायर, ठिकठाक केल्याशिवाय गाडी चालूही होणार नाही गाडी साफ-स्वच्छ केल्याशिवाय आपले मन बस रोडवर येऊ देणार नाही,ड्राइव्हर क्लिनर उचल घेतल्याशिवाय कामावर येणार नाहीत,
अशा एक ना अनेक अडचचींना सामोरे जावे लागणार आहे आणि जर एखाद्याने बस मालकाने सगळे दिव्य पार पाडून बस रोडवर आणलीच तर तिच्यात प्रवास करायला रोडवर तेवढे प्रवासी असणार आहेत का ?
पूढील ६ महिन्यांचा टँक्स माफ करून वाहाने सूरू करावी
पॅकेज टूर मूलत: ४ स्तंभावर अवलंबून असतो
१) शाळा-कॉलेज पिकनीक २) कॉप्रोरेट पिकनीक ३) धार्मिक सहली ४) लग्न- साखरपुडा यापैकी काहीही चालू नाही कधी चालू होईल माहित नाही
शाळा सूरू झाल्या शिवाय स्कूूल बसेस चालणार नाहीत त्यामूळे स्कूल बस कधी चालू होतील माहित नाही तेंव्हा जर या संकटाला सामोरे जायचे आहे आता आम्हाला यापुढील अनेक आर्थीक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे त्यात बँकांकडून मॉरीटोरीअमची मुदत वाढवून घेणे,कर्जावरील व्याज १००% लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत घेऊ नये, तसेच संपूर्ण लॉकडाऊन उठल्यानंतर चे ६ महिने कोणत्याही प्रकारचा टॅक्स घेऊ नये,व्यवसाय चालू करण्यासाठी कोणत्या प्रकारे सरकार कडून काही आर्थिक मदत मिळवि अशा प्रामाणिक मागण्या सरकारकडून मान्य करून घ्याव्या लागतील
आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी यासाठी प्रयत्न करतच आहेत, त्यया साठी दि २ सप्टेंबर २०२० रोजी होणारे राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत असे पुणे बस ओनर्स असोसिएन व जळगांव जिल्ह्यासह राज्यभरातील लक्झरी मालक संघटनेची मागणी आहे
------असा असतो रोड टँक्स --------
सिटींग लक्झरी बसेसला ४५ ते ४८ सिट करिता दर ३ महिन्यांसाठी सूमारे २७ हजार रू तर स्लीपर लक्झरी ३० सिट करिता ५६ हजार रूपये रोड टँक्स आर टी ओ कार्यालयाकडून आकारला जातो
-------------------'--------------------------
हा दूजाभव का ? अजय केले
गेल्या ६ महिन्यांपासून जिल्ह्यातील शेकडो लक्झरी धूळखात ऊभ्या आहेत नूकताच एस टी महामंडळाला गाड्या सूरू करण्याची परवानगी दिली त्यातील प्रवाशां करिता ई पास लागत नाही मात्र खाजगी वाहानांना ई पास का असा दूजाभाव आमचे बाबत का असे लक्झरी मालक संघटनेचे अजय केले यांनी म्हटले आहे आम्ही सर्वाधीक टँक्स शासनाला देत आलोय आमची वाहाने सूरू करण्याची परवानगी द्यावी त्यामूळे राज्य शासनाला रोड टँक्स टोल नाका डिझेल वरील व्हँट टँक्सचा फायदाच होणार आहे तर या व्यवसायातील शेकडो ट्रव्हल्स एजंट तसेच चालक क्लीनर यांची देखील ऊपासमार थांबेल पूणे मूंबई नागपूर या सारख्या शहरात जाण्यासाठी एस टी पेक्षा लक्झरीला अधीक प्रवाशी प्राधान्य देतात त्यांचीही सोय होईल जर एस टी प्रवासातून कोरोनाचा फैलाव वाढत नाही तर लक्झरीचा कसा वाढेल यावर शासनाने विचार करून लक्झरी सूरू करण्यास परवानगी द्यावी असे अजय केले रविंद्र चौधरी नरेंद्र सोनार यांचेसह खान्देशातील सर्वच लक्झरी चालक मालकांनी मागणी केली आहे
दररोज खान्देशातून पूण्याला सूमारे २५० तर मूंबईला १०० व ईतरत्र नागपूर जालना अहमदाबाद ईंदौर आदी ठिकाणी ५० लक्झरी जातात यातून दररोज लाखो रूपयांची ऊलाढाल होते