ग्रामीण आदिवासी वस्तीतही महिला सन्मानाचा जागर
लेकिच्या हस्ते झाला आई व काकुचा सत्कार
दि ८ शेळावे ता पारोळा
८ मार्च हा जागतिक महिला दिवस नारी सन्मान व नारी शक्तीचे प्रतिक म्हणुन साजरा केला जातो . या दिवसाच्या औचित्यावर विविध कार्यक्रमांचे मोठया प्रमाणात आयोजन केले जाते . पण ग्रामिण भागात व विशेष करून आदिवासी वस्तीत याबाबत उदासिनता दिसुन येते . हेच नेमके हेरून शाळेचे राज्य शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी जागतिक महिला दिवसाचा आगळा वेगळा कार्यक्रम शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व विदयार्थी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडला .
अगोदर मुख्याध्यापक साळुंखे यांनी गांवातील गजानन हायस्कुल पारोळाची इ ६ वीची विदयार्थीनी कु निकिता युवराज भिल इला नारी सन्मान म्हणुन एक दिवस शाळेचे मुख्याध्यापिका पद देण्यात आले . तीच्या हस्ते आपली आई दुर्गा भिल आशा सेविका यांचा उत्कृष्ट वैदयकिय सेवेबदल, म्हाळसा भिल यांना उत्कृष्ट अंगणवाडी सेविका कार्य व संगिता भिल यांनी दोन मुलींवरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली म्हणुन साडी चोळी, भेटवस्तु, शाल, श्रीफळ, पुष्प देऊन यथोचित सत्कार केला .
तसेच गावात नवीन विवाह करून आलेल्या व नव मतदार युवतींचे मतदार नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले .
केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी महिलांनी आता न घाबरता प्रत्येक क्षेत्रात भाग घ्या . कुटुंब मर्यादित व व्यसनमुक्त कसे राहिल आणि मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे मार्गदर्शन केले .
महिला सन्मानाचा व कौतुकाच्या या कार्यक्रमाचे महिला ग्रामस्थांना अप्रुप वाटले .
सुत्रसंचलन वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी तर गुणवंतराव पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील यांनी महिलांना साडी चोळी सप्रेम भेट पाठविल्या म्हणुन त्यांचे व उपस्थित सर्वांचे आभार मनवंतराव साळुंखे यांनी मानले . मुख्याध्यापिका निकिता भिल यांनी उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला .
