*पातोंडा ता. अमळनेर -* आज महिला दिना निमीत्त पातोंडा येथे प्रधानमंत्री कृषी कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षणात उत्तीर्ण महिलांना आज ग्रा.पं. पातोंडा येथे प्रमाण पत्र वाटप करून सन्मान करण्यात आला.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रधानमंत्री कृषी कौशल्य विकास योजने अंतर्गत पातोंडा मंडळातील पातोंडा, दहिवद खुर्द , टाकरखेडा येथील 200 शेतकरी पुरूष व महिलांनी प्रशिक्षण दिले होते. या सर्व प्रशिक्षणार्थींची जानेवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली त्यापैकी 187 प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी 50 प्रशिक्षणार्थी महिला उत्तीर्ण झाल्या. आज महिला दिना निमीत्त या सर्व उत्तीर्ण महिलांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी श्री किशोर मोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात प्रत्येक उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीस दि.18.02.2020 ते 18.02.2023 या कालावधी करीता न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीचा दोन लाख रूपयाचा अपघात विमा प्रधानमंत्री कृषी कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रदान करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक प्रशिक्षणार्थीच्या बॅक खात्यात प्रशिक्षण भत्ता म्हणून पाचशे रूपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती तालूका समन्वयक धनश्री मिस्तरी यांनी दिली. *या प्रसंगी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे श्री उमेश पाटील सर यांचा सत्कार सौ पूनम बिरारी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.* ग्रा.पं. सदस्या व माजी सरपंच शितल महेंद्र पाटील यांनी सुत्रसंचालन केले. या प्रसंगी पूनम बिरारी , ललिता लाड, रंजना बिरारी , आशाबाई लोहार, कविता लोहार , सुनिता लोहार, मनिषा पाटील , सीमा संदानशिव आदी महिला उपस्थीत होत्या. व तसेच जेष्ठ पत्रकारश्री एकनाथ लोहार व श्री अमित पवार व श्रीभूषण बिरारी यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थ व महिला यांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीरकरण्यात आले
