Halloween party ideas 2015




बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे

पारोळा प्रतिनिधी

शैक्षणिक धाबे येथिल जि. प . शाळेतील मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांचा उपक्रम
शिक्षण क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदल व बदललेली अध्यापन पध्दती याचा ध्यास अनेक शिक्षकांनी घेतलेला आहे . प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा तसेच गुणवत्तेचा ध्यास जोपासणाऱ्या या शिक्षकांनी अनेक नवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात निर्माण केल्या आहेत . अशाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबे केंद्र शेळावे ता पारोळा जि जळगाव येथील शाळेतील उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे हे विदयार्थ्यांना बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देत आहेत . I
मनवंतराव साळुंखे हे सात वर्षा पासुन आदिवासी वस्ती व शाळा धाबे ता पारोळा या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करीत आहेत . चांगले कार्य व अनेक शैक्षणिक , सामाजिक , राष्ट्रीय उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त असुन . आज पर्यंत ११८ पुरस्कार व पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहेत .
पारंपारिक, रटाळ तसेच निरस अध्यापन पध्दतीला विदयार्थी कंटाळतात म्हणुन त्यांनी स्वतःचा " आनंददायी शिक्षण प्रकल्प " तयार करून यु ट्युब व मा शिक्षण मंत्री साहेबांना सादर केला आहे . शेकडो शिक्षक बांधवांना त्याचा उपयोग होत आहे . याचाच पुढचा भाग म्हणुन बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया मनोरंजक होते . हसत खेळत सर्वच विषयाचे अध्यापन बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून करता येते . तसेच मध्ये मध्ये मुखवटयांचा वापर करून सामाजिक प्रश्नांची जागृतीही करतात . मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास हे विषय नाटयीकरणाच्या रूपाने ते शिकवितात . विदयार्थ्यांच्या आवडीचे पात्र त्यांना देऊन पाठय घटक शिकवितात म्हणून ते कायमस्वरूपी लक्षात राहतात . शिवाय याच बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, ग्लोबल वार्मिंग, स्वच्छ भारत अभियान, लेक वाचवा लेक शिकवा, जल साक्षरता, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, मुल्यशिक्षण, अंधश्रध्दा निर्मुलन, पशु पक्षी जलचर किटक बाबत भूतदया या विषयांचीही ते जनजागृती करतात . यासाठी वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांचे सहकार्य लाभत असुन गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी, केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.