अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 25 जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी 25 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात मतदार दिवस म्हणून साजरा होत आहे विद्यार्थ्यांना मतदानाचे काय महत्त्व आहे आपल्या एका मतामुळे एखादा उमेदवार विजय होऊ शकतो किंवा एखादा उमेदवार पडू शकतो म्हणून लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क मिळालेला आहे तो आपण बजावला पाहिजे आपल्या घरातील कोणती व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण घेतली तर लोकशाही अधिक दृढ होईल लोकशाहीचे महत्त्व वाढेल असे सांगितले.
यावेळी शाळेचे शिक्षक आय आर महाजन, अरविंद सोनटक्के ,एस के महाजन, एच.ओ. माळी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आय.आर.महाजन यांनी केले