Halloween party ideas 2015


खंडाळा येथे फुले दाम्पत्यास अभिवादन व पुरस्कार वितरण सोहळा

खंडाळा  -  पुणे येथे कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमसकॅंडी   यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन,  महात्मा फुले यांचा पुणे विश्रामबाग येथे सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत दिनांक १६ नोव्हेंबर १८५२ रोजी शालजोडी देऊन सत्कार केला.      या दिनाच्या १६७ व्या संस्मरणीय दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १७ नोव्हेंबर  २०१९ रोजी सकाळी ११।३० वाजता गुरुकुल विद्यामंदिर ,रजिस्टर ऑफिस मागील बाजूस, एम एस इ बी ऑफिस समोर, 
खंडाळा ता खंडाळा जि सातार येथे कार्यक्रमाचे  महात्मा फुले विचार अभियान संयोजक व फुलेंप्रेमीच्या वतीने  अभिवादन क्रांतिकार्य उजाळा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते श्री संपतराव जाधव आहेत.कार्यक्रमा करीता प्रमुख उपस्थिती मध्ये  श्री दीपक शिर्के श्री अष्टविनाकाय ग्लास प्रा. लि., श्री निलेश सोनवलकर उपसंपादक दैनिक स्थैर्य , श्री रोहिदास जाधव  अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर , मीनाक्षी कांबळे पुणे  अध्यक्ष ऑल इंडिया अँटी कॉर्पशन बोर्ड महाराष्ट्र राज्य, श्री राजेंद्र नेवसे सातारा जिल्हाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद , मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभिवादन कार्यक्रम फुले प्रेमींची ओळख स्वागत व पुरस्कार वितरण समारंभ तसेच महात्मा फुले विचार अभियान यशोगाथा तसेच महात्मा फुले व सद्य समाज व्यवस्था याबाबत विचार विनिमय होणार आहे.   
             याप्रसंगी विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बंधू भगिनींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल महात्मा फुले शिक्षक पुरस्कार पुढीलप्रमाणे श्री दिपक भुजबळ सातारा ,श्री अनिल शिंदे , फलटण, श्री सतीश जाधव सासवड ,श्री सुरेश जगताप मावडी, पुरंदर, श्री अप्पासो मोरे, पाटण श्री सूर्यकांत मोकाशी पाटण, सौ मृणाल जाधव मोर्वे ,सौ राजश्री खरात कांबळे खंडाळा, सौ कोमल गायकवाड, खंडाळा,   प्रा. पंकज बोबडे कापशी फलटण, प्रा. संगीता पवार फलटण ,सौ रजनी गेजगे विठ्ठलवाडी तरडगाव ,सौ मनीषा सोळस्कर खेड खंडाळा.
         महात्मा फुले यांच्या विचार प्रचार आणि प्रसार कार्याबद्दल महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार अँड. दिगंबर  आलट ,पुणे श्री राजेंद्र भागवत , फलटण आणि महात्मा फुले युवा गौरव पुरस्कार श्री नवनाथ होले पिंपरी चिंचवड श्री परमेश्वर बनकर बीड श्री किरण भोंडवे बीड श्री लहुजी अनारसे पिंपरी चिंचवड श्री अनिल लडकत माळवाडी  श्री नवनाथ शेंडे आंधळी श्री संतोष गोरे बोराटवाडी.                                 सामाजिक,विधायक,समाजहिताचे देशहिताच्या उल्लेखनीय कार्याबद्दल  महात्मा फुले सामाजिक पुरस्कार पुढील प्रमाणे वसीमअक्रम शेख ,कराड अध्यक्ष रेहबर-ए-जरिया फौंडेशन श्री विलास रघुनाथ वरे लेखक, खंडाळा,श्री जनार्धन धायगुडे उपअभियंता जि प सातारा श्री केशव होले, पाटस दौंड श्री भरत कर्णे डिस्कळ  खटाव श्री महेंद्र बोराटे, मुंबई श्री विजयकुमार शिंदे दहिवडी. याचबरोबर सामाजिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्कार पुढिलप्रमाणे सौ सुप्रिया भूमकर, खडकवासला, सौ गौरी पिंगळे पुणे, सौ सविता काळे मुंबई ,सौ वृषाली नवले ठाणे ,सौ स्वाती शिंदे, सोलापूर, सौ दुर्गा भोसले, शिवाजीनगर ,सौ निवेदिता बदडे, पुणे  ,सौ कल्पना जाधव  फलटण, सौ प्रिया ननावरे खंडाळा.
            अशी माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संदीप ननावरे व महात्मा फुले विचार अभियानाचे संयोजक अजित जाधव यांनी दिली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.