पूज्य सानेगुरुजी शिक्षक पतपेढीत पंचवीस वर्षात अध्यक्षपदी महिला विराजमान
सुलोचना पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड, सर्वत्र अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकरांच्या सहकारी पतपेढी अमळनेर यांच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंमळनेर यांच्या आदेशान्वये अध्यक्षपदाची निवड कार्यक्रम घोषित करण्यात आला होता त्यानुसार सर्व संचालक मंडळ आणि विचार विनिमय करून बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्याचे ठरवले त्यात शिवाजी विद्यामंदिर तांबेपूरा
येथील उपशिक्षिका व सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील
शिक्षक डी .के .पाटील सर यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुलोचना आबा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सुलोचना पाटील या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन होत आहे.
निवडणूक कार्यक्रम सहकार अधिकारी एस पी. महाजन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले सदर निवडणुकीत सकाळी अध्यक्षपदासाठी श्रीमती सुलोचना आबा पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी एस पी महाजन यांनी सुलोचना पाटील यांचे नाव घोषित केले.
बिनविरोध निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष राजेंद्र पवार, माजी सचिव जे.एस. पाटील, माजी उपाध्यक्ष कविता पाटील उपाध्यक्ष सचिन पाटील ,सचिव के यु बागुल ,संचालक आर.बी पाटील, आर एस. पाटील, तुषार पाटील , सौ वसुंधरा लांडगे, डी के पाटील ,डी सी पाटील, विसावे सर, मगर सर, व्यवस्थापक लोकनाथ पाटील यांनी प्रयत्न केले. श्रीमती सुलोचना पाटील या पहिल्या महिला अध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
महिला अध्यक्षा सुलोचना पाटील दैनिक साईमतशी बोलतांना सांगितले की साने गुरुजी शिक्षक पतपेढीत सर्व आजी व विद्यमान संचालक मंडळांनी माझ्यावर विश्वास दाखवला माझी बिनविरोध अध्यक्षपदी निवड केली. मी सदैव ऋणी राहील .अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभासदांच्या हिताला पतपेढीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील असे सांगितले.
