परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान
जिल्ह्यातील शेतकरी पाल्यांना फि सवलत ,मोफत बससेवा दया
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी.
अमळनेर प्रतिनिधी
खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्हातील शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवाची पिके पाण्याखाली गेली आहे. हाताशी आलेला घास सतत च्या पावसाने हिरावुन घेतल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. ऐन दिवाळी पर्वात जगाचा पोशिंदा बळीराजा हवालदील झालेला आहे.
शेतकरी राजाला दिलासा मिळावा म्हणून जळगाव जिल्हातील शेतकऱ्यांच्या मुलांना फी माफ करावी व मोफत बस पास मिळण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन मा .जिल्हाधिकारी जळगाव, मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मा.कुलगुरु कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांना पाठवण्यात आले आहे. सदर निवेदनाचा विचार करून बळीराजाला त्वरित दिलासा मिळाला अशी मागणी भूषण भदाने (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) यांनी केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे जिल्हाभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.