अमळगांव व अंतुर्ली केंद्रस्तरीय मतदार जनजागृती पुर्वतयारी आढावा बैठक
स्थळ:- नवीन माध्य विद्यालय, अंतुर्ली- रंजाणे ता.अमळनेर
अमळनेर प्रतिनिधी
आज दि.16-10-2019 रोजी दु.2:00 वा. अंतुर्ली व अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.गोकुळ आनंदा पाटील यांचे अध्यक्षतेखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी मतदानाचा टक्का वाढीसाठी मतदार जनजागृती पुर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. सभेस अंतुर्ली व अमळगाव केंद्रातील जि.प., शासकीय, खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, व आश्रम शाळांचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत करुन मतदान करणे व मतदानाबाबत जनजागृती करणे बाबत मा.श्री. गोकुळआबा यांनी महत्त्व पटवून दिले. तसेच मतदार जनजागृतीबाबत दि.17-10-2019 ते दि.21-10-2019 पर्यंत गावपातळीवर राबवयाच्या उपक्रमांबाबत खालील प्रमाणे सुचना देऊन त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
1) दि.17-10-2019 रोजी सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी गावपातळीवरील सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बचतगटाच्या महिला यांची मतदान जागृती पुर्वतयारी बैठकीचे आयोजन करणे.
2) दि.18-10-2019 रोजी तालुकापातळीवरुन मतदान जनजागृतीसाठी टोपी, प्रभातफेरीचे बोर्ड इ. साहित्य प्राप्त करुन घेणे.
3) दि.19-10-2019 रोजी स.7:00 वा.प्रभातफेरीचे आयोजन करुन प्रभातफेरीस सर्व विद्यार्थी उपस्थित ठेवणे तसेच गावपातळीवरील सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बचतगट महिला यांनाही प्रभातफेरीत सहभागी करणे.
4) आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
5) फोन टॅप केले जात असून फोनवरील संवाद व सोशलमिडीयाचा वापर करतांना काळजी घ्यावी.
6) 100% मतदान होणेसाठी 100% वोटरस्लिपांचे वाटप होणे गरजेचे आहे. त्यासाठी BLO यांनी वाटपाचे नियोजन पुर्ण करावे.
7) प्रभातफेरीसाठी घोषवाक्य फलक तयार करण्यात यावे. तसेच प्रभातफेरीचे GPS मॅप कॅमेरा द्वारे सकाळी शार्प 7:00 वा. प्रवेशद्वाराजवळील, नंतर गावातील व शेवटी प्रभातफेरी समाप्तीचा असे प्रत्येकी 2-2 फोटो काढून केंद्रप्रमुखांना वैयक्तिक पाठवावेत.
अशाप्रकारे सविस्तर सुचना देण्यात येऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्याबाबत सांगण्यात आले. तसेच
8)मतदार मतदान जनजागृतीचे सर्व फोटो जतन करुन ठेवावेत
9) 100% आपल्या केंद्रातील कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजवावा तसा अहवाल मुख्याध्यापकांनी दयावा
10) प्रभातफेरीत राजकीय , संघटना यांना सहभागी करू नये

