श्री क्षेत्र अरण येथे माळी समाजाची वास्तू उभारावी.
आमदार कृष्णाराव इंगळे
अमळनेर प्रतिनिधी- श्री क्षेत्र अरण ही तीर्थनगरी असून संत सावता महाराज यांची संजीवनी समाधी स्थळ आहे साक्षात पांडुरंगाने आपल्या भक्ताची दर्शन दिलेली आणि देश पातळीवरील लाखोंच्या उपस्थित हजारो श्रीफळ हंडी 16 ही वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान असून अशा ठिकाणी माळी समाजाच्या वतीने एक सामुदायिक वास्तू रूपाने सभामंडप निवासस्थान मंगल कार्यालय अशी उत्तम वास्तू उभारावी त्या समाजाने सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने समाजसेवेचे धोरण अंगीकारले पाहिजे त्यासाठी समाजातील लोकांनी पुढे आले पाहीजे व श्री क्षेेत्र अरण येथे माळी समाजाची वास्तु उभारावी असे संत सावता महाराज समाज भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत प्रसंगी मा.आमदार कृष्णराव इंगळे बोलत होते.
अखिल भारतीय माळी समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या 724 व्या पुण्यतिथी निमित्ताने राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उद्योग व्यापार इतर क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल माननीय आमदार कृष्णराव इंगळे यांना सहपत्निक आमदार अशोकराव मानकर नागपूर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदार अशोक मानकर म्हणाले की सध्या माळी समाजात संघटन नसल्याने सोळा आमदार असून देखील गेल्या चार वर्षात एकाही व्यक्तीला मंत्रीपद मिळाले नव्हते हे समाजाचे दुर्दैव आहे भाजपने आता तीन महिन्यासाठी अतुल सावे यांना मंत्रीपद दिले आहे ही समाधानाची बाब नाही आपल्या समाजाने एकत्र येऊन आपली शक्ती दाखवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
गेल्या काही वर्षापासून अखिल भारतीय माळी समाजाचे ज्येष्ठ नेते दशरथजी
कुळधरण व त्यांचे सहकारी बांधव
समाजाचे संघटन करून श्रीक्षेत्र अरण येथे एवढा भव्य दिव्य कार्यक्रम घडवून आणतात, समाजातील तरुण व ज्येष्ठांचा सत्कार सन्मान करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र अरण येथे महिला व तरुण वर्ग समाजातील ज्येष्ठ वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून माळी समाज कार्यक्रमासाठी एकवटला होता.