अमळनेर प्रतिनिधी
अ.शि.प्र.मंडळ संचलित साने गुरुजी नुतन माध्यमिक विद्यालय अमळनेर या शाळेत गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.डी.देशमुख व जेष्ठ शिक्षक श्री.सुनील. पाटील,श्री.दिलीप पाटील, श्री.डी.के.पाटील, श्री.आर.एम. देशमुख यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. शालेय विद्यार्थ्यांनी आई ही आपली पहिली गुरु असते .गुरुशिवाय मानसाच्या जीवनात ज्ञान नाही.गुरुंना भेट वस्तू देण्यापेक्षा त्यांची शिकवण कशी जीवनात आचरण कराल. हे महत्वाचेआहे. असे गुरुंविषयी मनोगत व्यक्त केले.सौ.आर.एस.सोनवणे यांनी गुरुंविषयी क्रुतज्ञता व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी आदरयुक्त भीती बाळगा.अध्यक्षीय भाषणात श्री.एस.डी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे यश,गुणवंत्ता संस्कारामुळेच गुरुजनांची ओळख होते.गुरुंचे नाव उज्वल कसे राहील असे जीवन जगा.असे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमात वक्तुत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक-धनंजय कैलास सुर्ते द्वितीय-रोहीत लांडगे त्रुतीय-रोहन संदीप पाटील. हे यशस्वीझाले. परीक्षक म्हणून सौ.आर.एस.सोनवणे,व श्री.दिलीप पाटील यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाला श्री.एस.डी.देशमुख, श्री.सुनील पाटील, श्री.डी.के.पाटील,श्री.आर.एम.देशमुख, सौ.आर.एस.सोनवणे, शिक्षकव्रुंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन कौस्तुभ पाटील, ज्ञानेश्वर मोरे यांनी केले.