शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर मोफत वाटप.
अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
अण्णाभाऊ साठे यांचे कार्य बहुजन समाजाला दिशादर्शक आहे असे अरविंद सोनटक्के यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभागप्रमुख आय आर महाजन यांनी केले.
मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना 40 शालेय मोफत दप्तर वाटप करण्यात आले. व सेवा सहयोग संस्था पुणे यांच्यावतीने ही शाळेतील 50 विद्यार्थ्यांना शालेय मोफत दप्तर वह्या कंपास पेटी यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांचे लेखन आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांचे वाचन होणे गरजेचे आहे असे सांगितले व ते पुढे म्हणाले की शालेय मोफत दप्तर शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आनंद दिसत होता सध्या देश राज्यात अनेक सामाजिक संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करीत असतात त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन आपल्या भावी जीवनाची वाट सुखद सुखकर करावी असे अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे स्काऊट शिक्षक एस .के .महाजन,एच ओ माळी , यांनी प्रयत्न केले तर शेवटी आभार प्रदर्शन एच.ओ. माळी यांनी मानले