अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान श्री मंगळग्रह मंदिर होय.या संस्थानच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात. मंदीराच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावर्षी ही शालेय विदयार्थ्यांनां शालेय दप्तराचे वाटप करुन सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम केले आहे.
शिवाजी हायस्कूल व ज्यु. कॉलेज तांबेपुर अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिर संस्थेकडून "मंगळग्रह मंदिराकडून ज्ञानमंदिराकड़े" या उपक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आल्या. शाळेचे प्राचार्य श्री.एम.ए. पाटील सर यांच्या शुभहस्ते स्कूल बॅग विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. त्या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री.एस. एम.पाटील सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शिवाजी हायस्कूल चे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एम ए पाटील यांनी मंगळ ग्रह संस्थांच्या विश्वस्तांचे आभार मानले.