Halloween party ideas 2015


बोहरा गावास पुर्णत बाधित घोषित करावे, गावकऱ्यांनी दिले तापी पाटबंधारे विभाग, प्रांत व तहसीलदारांना निवेदन....

अमळनेर प्रतिनिधी

 येथून जवळच असलेल्या व पाडळसरे धरणाच्या बाधित क्षेत्रात येणाऱ्या बोहरा गावास पूर्णत बाधित घोषित करावे अशी मागणी बोहरा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी की, बोहरा हे गाव तापी व बोरी नदीच्या संगमाजवळ उंच भागावर वसले आहे. व तापी नदी गावापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. गावाच्या समोरून तापी नदीस अनेर नदी येऊन मिळते व तिन्ही नद्यांचा प्रवाह या ठिकाणावरून प्रवाहित होतो. त्यामुळे सर्वसाधारण पावसातही गावास पाण्याचा वेढा पडतो. पुरामुळे मातीच्या घरांची पडझड होते. तसेच घरांमध्ये सतत ओलावा असतो. २००६ साली तापी नदीला आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांना स्थलांतरित व्हावे लागले होते. पाडळसरे धरण गावापासून २ किमी वर आहे. त्यामुळे बॅकवॉटर मुळे मातीच्या भरावावर वसलेल्या ह्या गावतिल माती खचून जीवित व  वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बॅकवॉटर मुळे कायम गावास पाण्याचा वेढा राहील. तरीही गावास अंशः बाधित घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बोहरा गावास पूर्णत बाधित घोषित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच लवकरात लवकर त्यासंबंधी आदेश काढावा अशी मागणी बोहरा पुनर्वसन समिती, बोहरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली आहे. 


त्यासंबंधीचे निवेदन तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, अमळनेर प्रांत अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले. तसेच निवेदनाच्या प्रती खासदार उन्मेष पाटील जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी बोहरा येथील भिमराव पाटील,शिवाजी धनगर, प्र.भा.पाटील, डॉ अशोक पाटील, अनिल पाटील, जितू पाटील, अण्णा पाटील, अनिल अहिरराव, दिपक पाटील, कैलास विंचूरकर, जयेश बागुल, पिंटू धनगर, सोपान धनगर, विजू भिळ, बंसी भिल, मंगल भील, कालू भील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.