Halloween party ideas 2015


नियमित  योगाभ्यासाने शरीर निरोगी बनते-स्वामी हंसानंद तिर्थ

पतंजली तर्फे "आंतरराष्ट्रीय योग दिन"साजरा

अमळनेर - योग ही आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. प्राचीन ॠषी मुनींनी योगाचे महत्व समजावून सांगितले. तर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगगुरू बाबा रामदेव  यांच्या माध्यमातून योग जागतिक पातळीवर पोहोचला आहे. नियमित योगाभ्यास केला तर शरीर निरोगी बनते. अनेक आजारांवर योग गुणकारी उपचार आहे.त्याचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  प.पु.महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तिर्थ  महाराज(मठाधिपती  श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान,कपिलेश्वर)यांनी केले. पतंजली योग समितीतर्फे येथील  प्रताप मिल कंपाउंडमधील  प्रमुख पेट्रोल पंपाशेजारील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय  योग दिवस कार्यक्रमप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर,पं.स.सदस्य भिकेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीस स्वामी हंसानंदजी महाराज,स्वामी महेश महाराज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक डॉ.चंद्रकांत पाटील,सिनेट सदस्य दिनेश नाईक,पं.स.सदस्य भिकेश पाटील, ह.भ.प.सारंगधर महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.जिल्हा योग प्रचारक कमलेश आर्य व महिला समितीच्या सौ.रत्नाताई भदाणे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थितांकडून योगाभ्यास  करून घेतला. या कार्यक्रमास वाडी संस्थान पाठशाळा, कपीलेश्वर संस्थांन पाठशाळेतील विद्यार्थी,  केमिस्ट असो.चे सदस्य,प्रगती टर्फचे नविन जैन व सहकारी,परिसरातील महिला,नागरिक,युवक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोमचे जळगाव उपविभाग जनसेवक दत्ता नाईक यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी .गिरीष पाटील सर, प्रा.डि.डि. पाटील, उर्मिला अग्रवाल प्रा.डि.आर.चौधरी, रोहित पवार, योगेश्वर बारी, योगीराज चव्हाण, शशिकांत पाटील, पंडित नाईक, हितेश शाह, संकल्प वैद्य, महावीर मोरे, यांनी परिश्रम घेतले. 

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.