Halloween party ideas 2015

पू सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
अमळनेर प्रतिनिधी-पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे ३१ आँक्टोबर लोहपुरूष सरदार पटेल याची जयंती व माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
   अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा प्रा.डॉ माधुरी भांडारकर होत्या.प्रस्ताविक संस्थेचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले.सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे उपाध्यक्षा डॉ प्रा माधुरी भांडारकर यांनी तर इंदीरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन सदस्य पी.एन भादलीकर यांनी केले. सरदार पटेल यांच्या विषयी माहिती सानेगुरुजी वाचनालयाचे
चिटणीस प्रकाश वाघ व
सदस्य दिपक वाल्हे यांनी तर इंदीरा गांधी यांच्या जीवनावर वाचनालयाचे सदस्य  ईश्वर महाजन यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक वाल्हे यांनी केले तर आभार ईश्वर महाजन यांनी मानले.यावेळी
हेंमत भांडारकर, दत्तात्रय बडगुजर व वाचक वर्ग उपस्थित होता.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाचे कर्मचारी सौ सिमा धाडकर, सुरेश जोशी,रमेश सोनार उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.