Halloween party ideas 2015

ऋषिपंचमी निमित्त श्री क्षेत्र कपिलेश्वर  सहा हजार महिलांनी भाविकानी घेतले दर्शन

अमळनेर  प्रतिनिधी

तापी व पांझरा नदीच्या संगमावर वसलेले कपिलेश्वर महादेवाचे मंदिर हे खान्देशातिल जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.आज ता.14 रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी मंदिरावर जवळ जवळ पाच ते सहा हजार महिला भाविकानी दर्शन घेऊन नदिवर स्नान केले. ऋषिपंचमीला अशा पावित्र्य तीर्थस्थानावर स्नान केल्याने, दुख पीडा दूर होऊन संकट नष्ठ होत असल्याची महिमा असल्याने   खान्देशाच्या कानाकोपर्यातून महिला भाविकांची गर्दी झाली होती.आचार्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंदजी तीर्थजी महाराज यांनी दुपारी एक ते अडीच वाज़े दरम्यान  ऋषिपंचमी या महात्म्यामावर  प्रवचन केले.नंतर महिलांनी पुजेला सुरुवात केली.कपिलेश्वर ऋषिपंचमी निमित्त मंदिरावर दर्शनासाठी जळगाव,भुसावळ,शिरपुर,धुळे,नंदुरबार अशा अनेक ठीकानाहुन महिला आल्या होत्या. यामुळे मंदिर परिसरला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.मंदिरावर पुजेच्या साहित्याची निम,मुडावद ,अमळनेर  येथील दुकाने थाटली होती.
मंदिराचे अध्यक्ष विश्वस्त श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट मुडावद निम (तापी पांझरा संगम)व समस्त भक्त परिवार यांनी बाहेर गावाहुन येणाऱ्या भाविकांसाठी निवास आदि सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी याठिकानी महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला होता.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.