Halloween party ideas 2015

माधवानंद दुध संकलन ग्रुप माळी वाडा,अमळनेर च्या सभासदांना भेट वस्तु वाटप.....................

.अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध माधवानंद दुध संकलन ग्रुप च्या सभासदाना दिवाळी निमित्त भेट वस्तु वाटपाचा कार्यक्रम ,श्री क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष-श्री.मनोहर महाजन सर,श्री.मनोहर माळी(उपाध्यक्ष),रक्तदान चळवळीचे प्रमुख श्री.मनोज शिंगाणे याच्या हस्ते करण्यात आला यावेळी माधवानंद दुध संकलन ग्रुपचे चेअरमन श्री.नितिन गुरव,संचालक, श्री.मोतीलाल महाजन,श्री.युवराज महाजन,श्री.शामराव महाजन,श्री.शालिक पहेवान व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन-श्री.कुवर गुरव सर यांनी तर आभार श्री.नितिन गुरव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकलन ग्रुपचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 *अमळनेरला बळीराजाची मिरवणूक....


अमळनेर प्रतिनिधी

दिवाळीचा उत्साह यंदा शिगेला असून अमळनेर येथे बळीराजाची भव्य सवाद्य मिरवणूक शहरातून म.बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आली.

                शिरूड नाका येथे सालाबादप्रमाणे  आ.अनिल पाटील, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, जि.प.सदस्या सौ जयश्री पाटील,अर्बन बँक चे व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, प्रा.सुभाष पाटील, मनोहर पाटील, प्रा.अशोक पवार,दिलीप पाटिल,कैलास पाटिल यांनी बळीराजाच्या भव्य प्रतिमेचे पूजन केले.यावेळी रा कॉ अध्यक्ष सचिन पाटील, एस एम पाटील, कृ उ बा संचालक विजय पाटील, नगरसेवक मनोज पाटील, रामकृष्ण पाटील, श्याम पाटील, निलेश साळुंके,यादव,संदेश पाटील,दिपक काटे,प्रशांत निकम,यांचेसह

सौ छाया सोनवणे, सौ.शशिकला पाटील, सौ.पूनम ठाकरे, मराठा सेवा संघाचे कैलास पाटिल यांनी शेतकरी गिते सादर केली. मिरवणुकीच्या सुरुवातीस जेष्ठ कार्यकर्त्या सौ वसुंधरा लांडगे  यांनी जिजाऊ वंदना गायली.सूत्रसंचालन प्रा.लिलाधर पाटील व विनोद कदम यांनी केले.मिरवणुकीच्या समारोप बळीराजा स्मारक येथे बळीराजा चे पूजन करून करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आभार मानले.मिरवणूक शिरूड नाका,वड चौक, बाळजीपुरा, वाघ बिल्डिंग, त्रिकोणी बाग, पाचपाऊली मंदिर, बस स्टँड, विश्राम गृह,तहसील कार्यालय मार्गे बळीराजा स्मारक पर्यंत फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत काढण्यात आली.चौकाचौकात बैलगाडीवरील बळीराजा प्रतिमेचे महिलांकडून पूजन करण्यात आले. 

             समारोपप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कदम, नगाव सरपंच महेश पाटील,शेतकी संघाचे संजय पुनाजी पाटील,शिव व्याख्याते रामेश्वर भदाणे,श्रीकांत चिखलोदकर,सयाजीराव कापडणेकर,अरुण देशमुख, डॉ.विलास पाटील, संजय सूर्यवंशी, आर पी पवार, पत्रकार मुन्ना शेख,लक्ष्मण महाजन आदींसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

              मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी बळीराजा समितीचे दिलीप पाटिल, संजयबाबा,शिवा पाटील, प्रकाश पाटील, गहिनीनाथ, उमेश ,अण्णा शेटे,संजय पाटकरी,अमोल पाटील,दत्तू अण्णा पाटील, रविआप्पा पाटील,बापूराव ठाकरे,अनंत सूर्यवंशी,आबा चौधरी, डॉ.युवराज पाटील, प्रदिप पाटील, नरेंद्र अहिरराव, अनिस शेख,लक्ष्मण पाटील,वाघ सर यांचेसह तरुण कुढापा मित्र मंडळ,जय अंबे मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या *अध्यक्षपदी मा.अण्णासाहेब श्री. जे.के.पाटील* यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल *जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या वतीने गौरव समारंभ*


*उद्या मंगळवार दि.१९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता*

 जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी जळगाव येथे 

*मा.यु.यु.दादा पाटील यांचे अध्यक्षतेखाली* व *आमदार डॉ.सुधीरजी तांबे साहेब व आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे.

याप्रसंगी *महापौर मा.जयश्रीताई महाजन व आमदार राजूमामा भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आपण या गौरव समारंभासाठी मुख्याध्यापक, शिक्षक बांधवांनी

अवश्य उपस्थित रहावे असे आव्हान माध्यमिक शिक्षक पतपेढी चे अध्यक्ष दादासाहेब शालिग्रामजी भिरूड यांनी केले आहे

रविवारी होणार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे उद्धघाटन.

*गृहमंत्री अनिल देशमुख,पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उदघाटन*

अमळनेर(प्रतिनिधी)

१ नोव्हेंबर २०२० रोजी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे उदघाटन गृहमंत्री अनिल देशमुख,जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. उदया राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी ,शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उदयाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे.अमळनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व डिवाएसपी ,
पोलिस निरीक्षक अंबादास मोरे ,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.विविध उद्घघाटन गृहमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा टिमतर्फे चाळीसगाव येथील अधिकारी वर्गाला चाळीसगाव ची जलक्राती पुस्तक भेट :नुतन गटविकास अधिकारी यांचे केले स्वागत


चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील सोळा गावामध्ये मागील वर्षी मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाअंतर्गत एकशे दोन कोटी लिटर जलसाठा निर्माण करण्यात आला या कामाची दखल गव्हर्नन्स या नामवंत मासिकाने घेत चाळीसगाव ची जलक्राती हा सप्टेंबर महिण्याचा विशेषांक संपादक धर्मेंद्र पवार यांनी तयार करून जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते व मिशन चे प्रमुख उज्ज्वल कुमार चव्हाण सर यांचे उपस्थित प्रकाशन करण्यात आले होते. या अनुसंघाने चाळीसगावचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तहसीलदार अमोल मोरे,पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड,स्टेशन प्रबंधक बडगुजर,मुख्य स्वास्थ्य निरिक्षक विलास पाटील यांची भेट घेत मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान अंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेणारेअम्रुतवेल गव्हर्नन्स मँगेझिन चाळीसगावची जलक्राती हे पुस्तक भेट देत स्वागत केले. याप्रसंगी पाचपाटील टिमचे प्रा.आर.एम.पाटील, तुषार निकम, सविता राजपूत, शशांक अहिरे,सोमनाथ माळी,धनंजय मांडोळे सहभागी झाले होते.

खान्देशात
राष्ट्रवादी शिरजोर काँग्रेस कमजोर..

-भाजपचे बहुजन नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश केला आणि राज्याचे राजकारण ढवळुन निघाले खडसेंच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस ला बळ मिळाले खान्देशात जळगाव धुळे नंदुरबार असे तीन जिल्हे येतात धुळे शहराचे माजी आमदार अनिल आण्णा गोटे अगोदरच राष्ट्रवादीत डेरे दाखल झाले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढली आहे सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच आमदार आहे यापूर्वी त्यांचे पाच सहा आमदार असायचे खानदेश पूर्वी कॉंग्रेस चा बालेकिल्ला होता त्याला शह देण्यासाठी एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले परंतु काळाच्या ओघात त्यांना ज्यांच्या विरोधात लढले ज्यांची ताकत कमी केली त्यांनाच ताकत देण्याचे काम करावे लागणार आहे खडसे लेवा पाटील समाजाचे आहेत समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे हा समाज आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडला गेला आहे असे मानण्यात येते धुळे जिल्ह्यातील अनिल आण्णा गोटे यांच्या मूळे धुळे शहरातील त्यांना मानणाऱ्या लोक राष्ट्रवादी ला जोडला गेला आहे त्यामुळे राजवर्धन कदमबांडे यांच्या पक्ष सोडल्या मूळे झालेली हानी भरून निघाली आहे त्यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा जोरात आली असल्याचे दिसून येत आहे.
त्या मानाने काँग्रेस पक्ष कोणतीही हालचाल करताना व डॅमेज कॅट्रोल करताना दिसत नाही खान्देशात आजही काँग्रेस ला अनुकूल वातावरण आहे धुळे नंदुरबार जिल्हा काँग्रेस चा बालेकिल्ला आहे अमरीश भाई व चंद्रकांत रघुवंशी यांचे सारखे दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडल्यावर देखील नंदुरबार जिल्ह्यातून दोन धुळे व जळगाव जिल्ह्यातुन प्रत्येकी एक अशे चार आमदार निवडून आले आहेत काँग्रेसने जर खान्देशात लक्ष दिले व सोशल इंजिनिअरिंग केले तर पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते यासाठी त्यांनी पक्षापासून दुरावलेले पारंपरिक मतदार जोडला पाहिजे अमरीश भाई व चंद्रकांत रघुवंशी पक्षातून बाहेर पडल्यामुळे ओबीसी समाज पक्षापासून दुरावला गेला आहे त्यामुळे काँग्रेस ने खान्देशातील ओबीसी समाजासाठी काम करणारा एखादा कार्यकर्त्याला राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी दिली तर पक्षाच्या फायद्याचे राहील खान्देशातील वीस मतदार संघात व लोकसभेच्या चार मतदार संघात त्याचा फायदा होईल त्यामुळे काँग्रेस पक्षांसह आघाडी ला फायदा होईल परंतु काँग्रेसचे थंडा करके खाओ या काम करायचा पद्धतीमुळे त्यांचे नुकसान होते परंतु त्यांनी खान्देशात अश्याप्रकारे सोशल इंजिनियरिंग केले तर काँग्रेस फायद्यात राहू शकते.
एकनाथराव खडसेंच्या पक्षांतरामुळे पुन्हा एकदा खानदेश केंद्रस्थानी आला आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोठया संख्येने आउट गोइंग झाले होते त्याचा फटका दोन्ही पक्षांना झाला आहे त्यामुळे ही हानी भरून काढण्यासाठी या दोन्ही पक्षांनी लक्ष देणे गरजेचे आहे सुदैवाने राज्यपाल नियुक्त आमदार करणे बाकी आहे त्याचा फायदा घेऊन खान्देशात काँग्रेसची ताकत वाढवणे गरजेचे आहे
काँग्रेस कडे उत्तर महाराष्ट्रात ओबीसी चेहरा नाहीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड हे पूर्वीपासून काम करीत आहेत त्यात अनिल आण्णा गोटे हे धनगर समाजाचे नेते जोडून घेतले आता खडसे साहेबांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे लेवासमाज जोडला जाइल त्यामुळे त्या पक्षाची ताकत निश्चितपणे वाढली आहे
काँग्रेसने ओबीसी शिक्षक नेते विलासराव पाटील यांना संधि द्यावी.
खान्देशात काँग्रेस पक्षाला एक ओबीसी चेहऱ्याची गरज आहे ती गरज विलासराव पाटील यांच्या रूपाने पुरी होऊ शकते ते एन एस यु आय या विध्यार्थी संघटनेचे काम करीत होते ओबीसी सेल चे काम केले आहे आणि आता काँग्रेस शिक्षक सेलचे नाशिक विभागाचे पदाधिकारी आहेत मुळात त्यांचा पिंड हा चळवळीचा आहे त्यामुळे सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात त्यांनी तीन वेळेस नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातुन ओबीसी शिक्षक संघटनेतर्फे निवडणूक लढवली आहे त्यामुळे त्यांचा अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे ते माळी महासंघाचे कर्मचारी आघाडीचे सोळा वर्ष प्रदेशाध्यक्ष होते आता ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रात सामाजिक स्तरावर जनसंपर्क दांडगा आहे ओबीसी संघर्ष समिती ओबीसी विध्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन च्या माध्यमातून ओबीसी साठी खूप काम केले आहे नुकतेच त्यांनी ओबीसीच्या भवितव्यासाठी ओबीसी जनगणना हे पुस्तक काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीवजी सातव यांचे हस्ते प्रकाशित केले आहे त्यांनी यासाठी काँग्रेस कडे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी अर्ज केला आहे काँग्रेस ने त्यांना जर नियुक्त केले तर माळी समाज ओबीसी समाज व शिक्षक काँग्रेस पक्षाला जोडला जाइल व काँग्रेस ची खान्देशात निश्चितच ताकत वाढल्या शिवाय राहणार नाही पण सद्यस्थितीत खान्देशात राष्ट्रवादी जोरात आणि काँग्रेस कोमात अशी स्थिती असल्याची चर्चा लोकांमध्ये दिसून येत आहे.

लेखक
ईश्वर आर.महाजन पत्रकार
राज्यकार्यकारणी सदस्य
महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई
9860352960,9766939950

जळगांव प्रतिनिधी
माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी भुसावळ येथे आज संचालक श्री शिवचरण उज्जैनकर सर यांची केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली च्या हिंदी साप्ताहिकाच्या अधिकृत मानद सहसंपादक पदी नुकतीच निवड झाल्याबद्दल पतपेढीचे अध्यक्ष श्री ललित सुपे सर, उपाध्यक्ष श्री प्रशांत नरवाडे सर , सचिव सौ रेखा चौधरी मॅडम, खजिनदार श्री एम आर चौधरी सर यांनी शाल, बुके व मानचिन्ह देऊन सत्कार केला याप्रसंगी पतपेढीचे माजी अध्यक्ष श्री डी.ए.पाटील सर, श्री शिरीष
वाणी सर श्री संजु भटकर सर ,श्री दीपक बारी सर, श्री महाजन सर , श्री मोरे सर, श्री सी.जे. पाटील सर व पतपेढीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉरविंद्र भोळे अरोग्य केंद्रात फ्लु तपासणी कम्प

उरुळीकांचन:प्राइमरी हेल्थ सेंटर च्या सहकार्याने उरुळी कांचन येथे कोरोना महामारिच्या शेवटच्या टप्प्यात येथे फ्लुक्लिनिक चे आयोजन करण्यात आले.डॉ रविंद्र भोळे अरोग्य सेवा केंद्र येथे ह्या फ्लु क्लिनिक चा तपासणी कम्प जाला.ह्या वेळी रुग्णाची अरोग्य तपासणी डॉ रविंद्र भोळे ह्यानी केली.ह्या वेळी प्राथमीक अरोग्य केंद्रातील कर्मचारी,आशा कर्मचारी उपस्थीत होते. कोरोना महामरिच्या पार्स्वभुमिवर असे कम्प खुप उपयुक्त असुन भीती युक्त व भय ग्रस्त वातवरण शुध्द होण्यासाठी हे कम्प अत्यंत मह्त्वाचे आहे ,असे मत जेस्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यानी प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.ह्या उपक्रमाला प्रार्थमिक अरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ सुचिता कदम ह्यानी मेडिसिन्ं दिलि.डॉ रविंद्र भोळे ह्यानी अनेक अरोग्यविषयक उपक्रम राबविले आहेत

अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर येथील बहुचर्चित वेस (दगडी दरवाजा) चे भूमिपूजन सोहळा २४ तारखेला सकाळी १० वाजता आमदार अनिल पाटील,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या शुभहस्ते व अमळनेर च्या लोकनियुक नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

*दगडी दरवाजाचा आजपर्यंतचा खडतर प्रवास*

अमळनेर वेस(दगडी दरवाजा) संरक्षित स्मारक राज्य संरक्षित स्मारकाच्या शासन निर्णय १५ जानेवारी १९७० अन्वये राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले होते.
कृषिभूषण साहेबराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी वेस (दगडी दरवाज्याच्या) स्मारक दुरुस्तीबाबत पाठपुरावा सुरू केला होता,त्यावेळी सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांनी दखल घेत २९ मे २००९ रोजी देखभाल व दुरुस्तीबाबत काही अटींवर परवानगी देण्यात आली होती.
दगडी दरवाजाचा पूर्वेकडील बुरुज २४ जुलै २०१९ रोजी पावसामुळे क्षतिग्रस्त झाला होता,त्यामुळे तात्पुरती गोण्यांची व्यवस्था करण्यात आली,परंतु भविष्यात हा क्षतीग्रस्त भाग पुन्हा कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने,खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक इतर रस्त्यावरून वळवण्यात आली होती.
या सर्व गोष्टींचा विचार करता अमळनेर वेस(दगडी दरवाजा) या संरक्षित स्मारकाचे जतन दुरुस्ती कामाऐवजी स्मारकाचे महत्व जतन करून अमळनेर शहरातील वाहतुकीची कायम कोंडी सोडवण्यासाठी, शहराची विकास यंत्रणा असलेल्या नगरपरिषद विकास योजनेनुसार(DP व TP) सदरची वेस देखरेख व दुरुस्ती कामाकरिता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार,अमळनेर नगरपरिषदेने ७ जानेवारी २०२० रोजी विशेष सभा क्रमांक ३२ ठराव क्रमांक ६९२ करून तसा प्रस्ताव नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनाला पाठपुरावा केलेला होता.
त्यानुसार वेस(दगडी दरवाजा) संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात यावे ही लोकप्रतिनिधींची मागणी मान्य करून सदर स्मारक नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्याचे १९ मार्च २०२० च्या पत्रात प्रस्तावित केले, तथापि कोरोनाच्या प्रभावामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांसमोर स्मारकाचे सादरीकरण करण्यास अडचणी येत होत्या,म्हणून स्मारकाच्या हस्तांतरणाची अधिसूचना रद्द करून,२६ जून २०२० च्या शासन निर्णय अन्वये संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई यांना महाराष्ट्र वैभव,राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेअंतर्गत अमळनेर नगरपरिषद यांना संगोपणार्थ १० वर्षासाठी अमळनेर वेस (दगडी दरवाजा) शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे.
त्याप्रमाणे अमळनेर नगरपरिषद यांनी शासन निर्णय २६ जून २०२० च्या अन्वये २२ ऑक्टोबर २०२० रोजी अमळनेर शहर हद्दीतील वेस(दगडी दरवाजा) साठीचे दुरुस्ती व संवर्धनाच्या कामाचे आदेश ठेकेदार अमन कन्स्ट्रक्शन यांना रक्कम १ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपये याप्रमाणे ठेका देण्यात आला.
सदर कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष बिजू लांबोळे, नगरसेवक मनोज दाजीबा पाटील,नरेंद्र संदनशिव,संजय पाटील,निशांत अग्रवाल,विवेक पाटील,रवि पाटील,बाबू साळुंखे,यनेश्वर पाटील,दीपक पाटील,साखरलाल महाजन,बबली पाठक,प्रताप शिंपी व नगरपरिषदेचे इतर नगरसेवक तसेच योगेश मुंदडे,विनोद भय्या,विक्रांत पाटील,हरी भिका वाणी,रणजित शिंदे,संदीप घोरपडे,सुभाष चौधरी,संतोष लोहेरे,पिंगळे डॉक्टर,भागवत गुरुजी,कमल दलाल,शेखा हाजी,फय्याज पठाण,सत्तार तेली,सुरेश पाटील,एल.टी.पाटील,
ठेकेदार चेतन शहा,चेतन सोनार,मुख्याधिकारी विद्या गायकवाड व नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी अमळनेर नागरी हित समितीतर्फे अशोक पवार तसेच राजे संभाजी मित्र मंडळाचे पंकज चौधरी यांनी कृषिभूषण साहेबराव पाटील व पुष्पलता पाटील यांचा सत्कार केला.
सदर दगडी दरवाजा नगरपरिषदेला देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्याकामी आमदार अनिल भाईदास पाटील,तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,प्रांत सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

*नगरपालिकेच्या तिजोरीवर भार पडणार*
सदर कामासाठी १ कोटी १२ लाख, ९९ हजार २७३ रुपये प्रस्तावित आहेत.नगरपालिकेच्या तिजोरीवर जरी भार पडणार असला तरी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी याकामासाठी ५० लाखापेखा जास्तीचा निधी शासनाकडून आणण्याचे या प्रसंगी मान्य केले आहे,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील हा एक प्रकल्प आहे.खऱ्या अर्थाने स्मारक नव्याने उभं राहिल्यानंतर त्यांची ती स्वप्नपूर्ती ठरेल.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने अमळनेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष.

प्रतिनिधी-अमळनेर.

शुक्रवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर सर्व कार्यकर्त्यांनी फाटके फोडून जल्लोष साजरा केला, त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, रणजित पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, मुसरी शेख, आरिफ पठाण, पप्पूभाऊ कलोसे, देविदास देसले, प्रशांत भदाणे, करीम शेख, इमरान खाटीक, काजल शेख, बाळू पाटील, संभाजी पाटील, युवक काँग्रेस शहराध्यक्ष निलेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गोविंदा बाविस्कर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, निनाद शिसोदे, दर्पण वाघ, शुभम पाटील, अनिरुद्ध शिसोदे, कल्पेश गुजराथी, यतीन पवार, अमोल पाटील, पंकज पाटील, उमेश पाटील, असिफ पिंजारी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.