Halloween party ideas 2015


पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राजषी शाहू महाराज जयंती साजरी
अमळनेर प्रतिनिधी 
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे राजषी शाहू महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे  चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले तर वाचनालयाच्या उपाध्यक्षा डॉ. माधुरी भांडारकर यांनी प्रतिमेचे   माल्यार्पण केले. राजश्री शाहू महाराज यांचे कार्य बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रा. डॉ. माधुरी भांडारकर व जेष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी सांगितले 
   तर अध्यक्षीय भाषणातून दिलीप सोनवणे म्हणाले की राजश्री शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते समाजातील तळा काळातली मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले . त्यांच्या विचारातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी असे सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले कार्यक्रमास सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक पी.एन.भादलीकर, वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते छोटी आभार प्रदर्शन ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी मानले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.